आम्ही महाराष्ट्राला मविआचं ‘एटीएम’ होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रधान मोदी
विदर्भात कॉंग्रेसची कित्येक सरकारानी पाण्याची समस्या सोडविली नाही. आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या सिंचन योजना महाविकास आघाडीने बंद पाडल्या असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला येथील सभेत केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला येथील सभेत कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्याच्या संकटाची जननी कोण असेल ती कॉंग्रेस आहे. कॉंग्रेसची कित्येक सरकार येथे आली तर ते अकोला येथील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करु शकलेली नाही. कर्नाटकात तर कॉंग्रेस सरकारने दारुच्या दुकानदारांकडून सातशे कोटी वसुल केलेले आहेत. ही कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर काय करु शकते याचा विचार करा, किती घोटाळे करु शकते याचा विचार करुनच कॉंग्रेसला थारा देऊ. आम्ही महाराष्ट्राला मविआचं एटीएम होऊ देणार नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी जे सिंचनाचे प्रकल्प सुरु केले होते. ते महाविकास आघाडीच्या सरकारने बंद करुन टाकले. अकोला कापसाच्या शेतीसाठी ओळखला जातो. आम्ही कापसाच्या शेतकऱ्यांना अनेक दशके कॉंग्रेसने न्याय दिलेला नाही. कापूस शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी उद्योग आणि इन्फ्रोस्ट्रक्टर दोन्ही वाढविले जात आहे. मी महाराष्ट्रात टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन केले आहे. टेक्सटाईल पार्कने समृद्धीच्या नव्या संधी निर्माण होतील असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.