आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत भाजप-काँग्रेस आमने-सामने, विषारी शब्दांची बरसात
मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी साप आहेत. ते विष ओकत असतात. तुम्ही त्यांच्या सहवासात गेलात तरीही तुम्ही मरुन जाल असं म्हटलं होतं.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे विषारी सापासारखे आहेत असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केलं. त्यानंतर भाजप-काँग्रेस आमने-सामने आली आहे. भाजपकडून काँग्रेसवर आणि खरगे यांच्यावर टीका केली जात आहे. यानंतर हा वाद काही थांबताना दिसत नाही. कर्नाटक निवडणुकीच्या (Karnataka Elections) निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यादरम्यान आता भाजपच्या एका आमदाराने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा उल्लेख विषकन्या असा केला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी साप आहेत. ते विष ओकत असतात. तुम्ही त्यांच्या सहवासात गेलात तरीही तुम्ही मरुन जाल असं म्हटलं होतं. त्यावर अमित शाह यांनी पलटवार करत कर्नाटक जनता काँग्रेसला कधी माफ करणार नाही असे म्हटलं होतं. त्यावर भाजप आमदार बासनगौडा पाटील यांनी सोनिया गांधींवर टीका करताना, ज्या पक्षात तुम्ही नाचत आहात सोनिया गांधी विषकन्या आहेत. सोनिया गांधी या चीन आणि पाकिस्तानसोबत मिळून त्यांच्या एजंटचं काम केलं. अशी टीका केली आहे. त्यानंतर आता टीकेची झोड उठली आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट