संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर; भाजपकडून जोरदार तयारी

संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर; भाजपकडून जोरदार तयारी

| Updated on: Jan 10, 2023 | 10:51 PM

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत

मुंबई : राज्यात सध्या संघर्षावर जोरदार टीका होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी पार पडली. तर यावर पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे. याच दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. भाजपच्या मिशन मुंबईच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

पंतप्रधान मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तर त्यांच्या हस्ते मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. याचवेळी ठाण्यातील कॅन्सर हॉस्पीटलचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपूर्ण बैठकही पार पडणार आहे.

Published on: Jan 10, 2023 10:50 PM