सामनातून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदी यांच्या आगपाखड; ‘मोदी हे सूर्याचे मालक नाहीत, 2024 ला त्यांचा सूर्य…’
तर पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर बोलावे यासाठी सरकारवर अविश्वास ठराव आणला. यानंतर पंतप्रधान मोदी संसदेत आले. त्यांनी विरोधकांच्या अनेक मुद्द्यांना थेट हात न घालता जोरदार फटकेबाजी केली. मोदींनी जवळपास दोन तासांहून अधिक काळ भाषण केलं मात्र मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर ते बोलले नाहीत.
मुंबई, 12 ऑगस्ट 2023 |देशाच्या संसदेचं अधिवेशन काल संपले. यावेळी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तर पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर बोलावे यासाठी सरकारवर अविश्वास ठराव आणला. यानंतर पंतप्रधान मोदी संसदेत आले. त्यांनी विरोधकांच्या अनेक मुद्द्यांना थेट हात न घालता जोरदार फटकेबाजी केली. मोदींनी जवळपास दोन तासांहून अधिक काळ भाषण केलं मात्र मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर ते बोलले नाहीत. पण काँग्रेसवर टीका करण्यातच घालवला. यावरून आता ठाकरे गटाकडून मोदी यांच्यावर निशाना साधण्यात आला आहे. यावेळी ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. यात मोदी यांच्या भाषणात अहंकार, न्यूनगंड, चिडाचिडच जास्त होती. त्यांनी, काँग्रेसला मोठे केलं. पण ते मणिपूरवर काहीच बोलू शकले नाहीत. ते काही सूर्याचे मालक नाहीत. तर त्यांचा सूर्य 2024 ला उगवणार नाही अशी जोरदार टीका करण्यात आली आहे.