काँग्रेस पक्षही फुटणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आमदार फुटून बाहेर…”
अजित पवार यांनी आपल्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री केली. त्यामुळे महाराष्ट्रात महाभूकंप आला आहे. असं असताना आता महाराष्ट्र काँग्रेस फूटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा: महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कधी कोणासोबत जाईल हे काही सांगता येत नाही. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीमध्येही मोठा बंड झाला. अजित पवार यांनी आपल्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री केली. त्यामुळे महाराष्ट्रात महाभूकंप आला आहे. असं असताना आता महाराष्ट्र काँग्रेस फूटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “राज्यातील काँग्रेसच्या विधानसभा सदस्यांची संख्या 45 असून, त्यातील 30 किंवा त्याहून अधिक आमदार फुटून बाहेर पडतील अशी सूतराम शक्यता नसल्याचा दावा करताना मात्र, भाजपच्या गोटातून अफवा पसरवण्याचे काम होत आहे.जे शिवसेनेबाबत घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडेल आहे. त्यात नेते सोडून गेले असलेतरी…”, पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…