शिंदे गटाची अवस्था म्हणजे कुछ चार दिन की चांदनी फिर काली रात, प्रियंका चतुर्वेदीचा हल्लाबोल

“शिंदे गटाची अवस्था म्हणजे कुछ चार दिन की चांदनी फिर काली रात”, प्रियंका चतुर्वेदीचा हल्लाबोल

| Updated on: Jun 19, 2023 | 12:16 PM

काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. यावरू शिवसेना आणि भाजपने उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. यावर आता ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. यावरून शिवसेना आणि भाजपने उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. यावर आता ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”आमच्या हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देण्याची गरज आम्हाला नाही आहे. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने हिंदुत्वाच्या भूमिकेवर कायम आहे.शिंदे आणि फडणवीस यांची टोळी असंवैधानिक आहे, आमच्या हिंदुत्वाच सर्टिफिकेट आम्ही या टोळ्यांना का दाखवू?,” असं त्या म्हणाल्या. प्रियंका चतुर्वेदी यांनी मनिषा कायंदे यांच्या बंडावरही भाष्य केलं आहे. “शिवसेनेच्या इतिहास पाहिला तर ज्यांनी पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांचं करिअर संपलं आहे. मनिषा कायंदे यांचं ही असंच होईल. कुछ चार दिन की चांदणी फिर काली रात”, अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.

Published on: Jun 19, 2023 12:04 PM