पीएफआयवर कारवाईसाठी इतका वेळ का लागला?, प्रियांका चतुर्वेदी यांचा सवाल

“पीएफआयवर कारवाईसाठी इतका वेळ का लागला?”, प्रियांका चतुर्वेदी यांचा सवाल

| Updated on: Sep 24, 2022 | 3:38 PM

प्रियांका चतुर्वेदी माध्यमांशी बोलत होत्या. तेव्हा त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई : शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पीएफआय कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे. पीएफआयवर कारवाईसाठी इतका वेळ का लागला?, असा सवाल त्यांनी विचारला. काश्मीरबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलंय. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नेहमी म्हणतात की संपूर्ण काश्मीर आपल्याला मिळणार आहे. मग त्याची तारीख कधी जाहीर करणार आहात?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

Published on: Sep 24, 2022 03:37 PM