बदनामीची सुरूवात तर घरातूनच!; 'त्या' व्हायरल व्हीडिओवर प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया

बदनामीची सुरूवात तर घरातूनच!; ‘त्या’ व्हायरल व्हीडिओवर प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 14, 2023 | 11:01 AM

Priyanka Chaturvedi on Shital Mhatre Video : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हीडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या काय म्हणाल्यात पाहा...

नवी दिल्ली : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हीडिओवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो व्हीडिओ यरल झाला आहे, तो राज सुर्वे यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लाईव्ह होता. त्यामुळे त्यांची बदनामी ही प्रकाश सुर्वेंच्या घरातूनच सुरू झाली आहे, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत. या प्रकरणात मग अटक करायची तर राज सुर्वे यांनाच करायची होती. या प्रकरणाचा तपास सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांकडून केलं जातच आहे, असंही प्रियांका म्हणाल्या.

Published on: Mar 14, 2023 10:57 AM