Priyanka Chaturvedi | असंवैधानिक मंत्र्यांची शपथ थोड्याच दिवसांची, प्रियंका चतुर्वेदी यांची टीका
'संजय राठोड यांच्याविषयी अनेक मोठ्या गोष्टी बोलण्यात आल्या. चित्रा वाघ यांनी त्यांचा प्रश्न मांडला होता. पण, सर्वात आधी राठोड यांनाच शपथ देण्यात आली,' असंही चतुर्वेदी यावेळी म्हणाल्यात.
मुंबई : खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी शिंदे (Eknath Shinde) -फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) टीका केली आहे. शिवेसना खासदार चतुर्वेदी म्हणाल्या की, ‘एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आज चाळीस दिवसानंतर शपथविधी पार पडला आहे. सिनियर भारतीय जनता पार्टी आणि ज्युनियर भारतीय जनता पार्टी म्हणजे जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लीड करत आहेत. त्यांना फक्त सत्तेचं सुख पाहिजे होतं, सत्तेची जबाबदारी नव्हती पाहिजे. त्यांना अठरा आमदारांमध्ये एकही महिला आमदाराला मंत्री करावं असं वाटलं नाही. यावरुन महिलांविरोधी विचार असल्याचं दिसून येतं. संजय राठोड यांच्याविषयी अनेक मोठ्या गोष्टी बोलण्यात आल्या. चित्रा वाघ यांनी त्यांचा प्रश्न मांडला होता. पण, सर्वात आधी राठोड यांनाच शपथ देण्यात आली,’ असंही चतुर्वेदी यावेळी म्हणाल्यात.