यूजीसीचा गोंधळ, 'नेट' परिक्षा राज्याबाहेर; भावी प्राध्यापकांचे हाल

यूजीसीचा गोंधळ, ‘नेट’ परिक्षा राज्याबाहेर; भावी प्राध्यापकांचे हाल

| Updated on: Mar 13, 2023 | 7:46 AM

देशभरात वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पात्रतेसाठी यूजीसीकडून राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेतली जाते. मात्र या परीक्षेसाठी बसलेल्या काही विद्यार्थ्यांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्रे मिळाल्याने युजीसीचा गोंधळ समोर आला आहे

मुंबई : आधीच राज्याती प्राध्यापक भरती आणि तासिका तत्वांवर काम करणाऱ्या प्राध्यपकांचा असंतोष भरती प्रक्रिया रखडल्याने खदखदत आहे. त्यातच आता युजीसीने त्यात आणखी खतपाणी घालण्याचे काम केल्याचे समोर आले आहे. देशभरात वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पात्रतेसाठी यूजीसीकडून राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेतली जाते. मात्र या परीक्षेसाठी बसलेल्या काही विद्यार्थ्यांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्रे मिळाल्याने युजीसीचा गोंधळ समोर आला आहे. काहींना भोपाळ तर काहींना हैदराबाद अशी परीक्षा केंद्र मिळालेली आहेत. त्यामुळे इतक्या लांब परीक्षा केंद्रे मिळाल्याने अनेकांना परिक्षेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 13, 2023 07:46 AM