शिंदे गट मतभेदावर रवींद्र चव्हाण म्हणाले, आम्ही एकत्रच

शिंदे गट मतभेदावर रवींद्र चव्हाण म्हणाले, आम्ही एकत्रच

| Updated on: Jan 11, 2023 | 5:47 PM

विधान परिषदेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफुस सुरू आहे. तर त्यावर खूद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाराजस असल्याचे सांगण्यात येत होते.

रत्नागिरी : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपसह मीत्र पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. याच्याआधीच सत्ताधारी भाजप- शिंदे गटात धुसफुस सुरू असल्याच्या चर्चांना उत येत आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषदेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफुस सुरू आहे. तर त्यावर खूद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाराजस असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावरच आता आम्ही एकत्र असून आमच्यात मतभेद नाहीत असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे.

बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र असून एकत्रितपणे संपूर्ण निवडणुका लढत आहेत. त्यामध्ये यश देखील मिळत आहे म्हणूनच विरोधक कुठेतरी निरटन निर्माण करत आहेत. ‘आपले पूर्ण महाराष्ट्रात भाजप शिंदे गट मतभेद या प्रश्नावर उत्तर देताना रवींद्र चव्हाण म्हणाले.