फडणवीस यांच्यानंतर आता भाजपच्या मंत्र्याकडूनही मोदी यांचा गौरव; म्हणाला, ‘मोदींमुळे श्वास’

फडणवीस यांच्यानंतर आता भाजपच्या मंत्र्याकडूनही मोदी यांचा गौरव; म्हणाला, ‘मोदींमुळे श्वास’

| Updated on: Jun 26, 2023 | 10:08 AM

तर देशातील जनता पंतप्रधान मोदी यांच्यामुळे जीवंत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदारल निशाना साधला होता. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना, जर मोदींनीच लस तयार केली तर मग संशोधक काय गवत उपटत बसले होते का, अशी टीका ठाकरे यांनी केली होती.

अंबरनाथ : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई कल्याण येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गौरवद्गार काढले होते. तसेच त्यांनी मोदींनीच कोव्हिडची लस तयार केल्यामुळे कोट्यवधी लोक जीवंत असल्याचं म्हटलं होतं. तर देशातील जनता पंतप्रधान मोदी यांच्यामुळे जीवंत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदारल निशाना साधला होता. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना, जर मोदींनीच लस तयार केली तर मग संशोधक काय गवत उपटत बसले होते का, अशी टीका ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील कोरोनाच्या काळातील दाखला दिला आहे. त्यांनी यावेळी कोरोनाच्या काळात आपण सर्वजन जो श्वास घेत आहोत तो मोदी यांच्यामुळेच घेत आहोत असे म्हटलं आहे. त्यावरूनही आता टीका होत आहे.

Published on: Jun 26, 2023 10:08 AM