अमित शाह टिळक कुटुंबाच्या भेटीला, नेमकी काय चर्चा?

अमित शाह टिळक कुटुंबाच्या भेटीला, नेमकी काय चर्चा?

| Updated on: Feb 19, 2023 | 7:57 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे यांनी दौऱ्यावर असताना टिळक कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर शैलेश टिळक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पाहा...

पुणे : पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होतेय. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याने पुण्यातील ब्राह्मण समाजात नाराजीचा सूर आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे यांनी दौऱ्यावर असताना टिळक कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर शैलेश टिळक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “अमित शाह पुणे दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची भेट घेतली. मुक्ता टिळक यांच्याबद्दल अमित शाह यांनी आपुलकीने विचारपूस केली. आमच्या या भेटीत राजकीय कुठलीही चर्चा झालेली नाही”, असं शैलेश टिळक म्हणालेत. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही जिंकणार आहोत. कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे सेनेतील कार्यकर्ते चार्ज झाले आहेत, असंही ते म्हणाले.

Published on: Feb 19, 2023 07:57 AM