टिळक कुटुंबावर अन्याय, म्हणून मी मैदानात; आनंद दवे कसबा पोटनिवडणूक लढणार
कसबा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने अनेकजण नाराज आहेत. हिंदु महासंघही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने अनेकजण नाराज आहेत. हिंदु महासंघही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. “वंदनीय शिवप्रभू, संभाजी राजे आणि श्रद्धेय वीर सावरकर, पूजनिय हेडगेवारजी गुरुजी आणि गोळवळकरजी गुरुजी यांना स्मरून, स्वर्गीय मुक्तताईंचा आशीर्वाद घेऊन हिंदु महासंघ ही निवडणुक लढवणार आहे.खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्याबरोबरच पुण्येश्वराला मुक्त करणं आणि स्वच्छ, सुरक्षित आणि सभ्य कसबा हेच आमचं ध्येय असणार आहे, असं हिंदु महासंघचे आनंद दवे यांनी यावेळी सांगितलं आहे.
Published on: Feb 07, 2023 04:18 PM
Latest Videos