पुणेकरांच्या सुखदु:खात सहभागी होणारा नेता गेला; राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर
Ankush Kakde on Girish Bapat Passed Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या त्यांनी अखेरचा श्वास वर्षी घेतला. पाहा व्हीडिओ...
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या त्यांनी अखेरचा श्वास वर्षी घेतला. बापट यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. गेली 30-35 वर्षे आम्ही एकत्र काम केलं. बापट यांच्या जाण्याने अतीव दु:ख होतंय. चांगला मित्र गमावल्याचं दु:ख आहे, असं अंकुश काकडे म्हणालेत. गिरीश बापट यांचं पार्थिव दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत शनिवारपेठेतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. आज संध्याकाळी 7 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
Latest Videos