Avinash Bhosale | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटींची प्रॉपर्टी सील

| Updated on: Jun 21, 2021 | 8:16 PM

ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. (Pune-based builder Avinash Bhosale's property worth Rs 40 crore sealed)

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणाता आता ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.