Pune Chandani Chowk : चांदणी चौकातील पुलाचं काम लवकरच पूर्ण होणार; 'या' दिवशी होणार लोकार्पण

Pune Chandani Chowk : चांदणी चौकातील पुलाचं काम लवकरच पूर्ण होणार; ‘या’ दिवशी होणार लोकार्पण

| Updated on: Mar 13, 2023 | 10:58 AM

पुण्यातील चांदणी चौकाचं काम दीड महिन्यात होणार पूर्ण आहे. लवकरच हा पूल लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या चांदणी चौकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी...

पुणे : पुण्यातील चांदणी चौकाचं काम दीड महिन्यात होणार पूर्ण आहे. एप्रिल अखेरीस पुलाचं काम जाणार पूर्ण केलं जाणार आहे. 1 मेला म्हणजे महाराष्ट्रदिनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर हा पूल लोकांच्या सेवेत दाखल होईल. ब्लास्ट करून चांदणी चौकातील पुल पाडण्यात आला होता. त्यामुळे प्रवाश्यांना वाहतूक कोंडाचा सामना करावा लागत होता. आता पुणेकरांचा हा प्रश्न लवकरच सुटणार आहे. चांदणी चौकातील पुलाचं काम लवकरात लवकर होणार आहे. त्यामुळे मुंबईहून साताऱ्याकडे जाणारी आणि पुणे शहरात जाणारी बरीच वाहतूक कोंडी सुटणार आहे.

Published on: Mar 13, 2023 10:58 AM