चांदणी चौकातील पूलाच्या पाडकामाच्या तयारीला सुरुवात, पण स्थानिकांना नोटीस नाहीत!
Chandni Chowk Bridge : पुण्यातील चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या पाडकामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मात्र या सगळ्या संदर्भात स्थानिक नागरिक अनभिज्ञ आहेत.
अश्विनी सातव-डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या (Chandni Chowk Bridge) पाडकामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मात्र या सगळ्या संदर्भात स्थानिक नागरिक अनभिज्ञ आहेत. या कामासंदर्भात अद्याप परिसरातील हॉटेलचालक आणि रहिवाशांना नोटीस मिळालेल्या नाहीत. जिल्हा प्रशासनाकडून या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भात नोटीस पाठवली जाईल, असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. ज्या दिवशी पूल पाडणार (Demolition) त्या दिवशी नेमके काय होणार? याविषयी स्थानिक नागरिक अनभिज्ञ आहेत.
Published on: Sep 29, 2022 10:18 AM
Latest Videos