जेव्हा हातातून सगळं जातं तेव्हा माणूस तडफडतो, तसं उद्धव ठाकरे यांचंही झालंय; भाजपच्या वरिष्ठ नेत्याची टीका
Chandrakant Patil on Uddhav Thackeray : पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
पुणे : भाजपचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जेव्हा हातातून सगळं जातं तेव्हा माणूस तफफडतो. तेच-तेच शब्द ,तीच तीच टीका याला लोक कंटाळले आहेत, असं चंद्रकात पाटील म्हणाले आहेत. शिवसेना आणि भाजप आम्ही काय करायचं ते ठरवू. 120 आमदार असूनही आम्हाला हिंदुत्ववासाठी निर्णय घ्यावा लागला. आमचा पक्ष बैठक घेऊन पुढची दिशा ठरवेल, असंही ते म्हणाले. कसब्यात भाजप हारली ईव्हीएम चांगली म्हणायचं अणि चिंचवडमध्ये हरले की इव्हीएम चांगलं नाही म्हणायचं. असा दुटप्पीपणा बरा नव्हे, असंही चंद्रकात पाटलांनी म्हटलं आहे.
Published on: Mar 27, 2023 01:57 PM
Latest Videos