अन् मनसे नेते वसंत मोरे पक्षात पुन्हा नाराज, काय आहे कारण?

| Updated on: Mar 30, 2023 | 9:26 PM

VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरातील नेते वसंत मोरे पक्षात नाराज? स्वतः दिली टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया

पुणे : पुणे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे पक्षात पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा होत आहे. मनसे नेते वसंत मोरे यावेळी स्थानिक राजकारणामधून नाराज असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरापासून पक्षात वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्या दरम्यान इतर पक्षांकडून त्यांना अनेक ऑफर देण्यात आल्या होत्या. परंतु आपण मनसेतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यंदा मनसे कसबा विभागाच्या वतीने रामनवमी निमित्त रामाच्या आरतीचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा गुरुवारी सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. माझ्या विरुद्ध पक्षातून षडयंत्र केले जात आहे. ठरवून पक्षातील काही लोकांकडून मला डावललं जात आहे. शिवतीर्थावर दोन नंबरच्या रांगेत बसणारा मी आहे. परंतु माझं नाव पत्रिकेत वगळलं जातंय.  मला आता ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. मी लवकरच राज ठाकरे यांच्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 30, 2023 09:26 PM
रामनवमी निमित्तानं थेट कॉफी हाऊसमध्येच युवकांनी केलं हनुमान चालीसा पठण!
शिक्षकाची अनोखी कला, फलकावर साकारलं प्रभू श्रीरामाचं रेखीव चित्र