Pune Pashan Talav | पुण्यातील पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना नो एन्ट्री – tv9
पाषाण तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार उद्यान विभागाकडे करण्यात येत होती. त्यावरून आता हा निर्णय घेण्यात आले आहे.
पुणे शहरातील पाषाण परिसरात असणाऱ्या पाषाण तलावावर आता अविवाहित जोडप्यांना जाता येणार नाही. महानगर पालिकेच्या उद्यान विभागाने हा निर्णय घेतला आहे. पाषाण तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार उद्यान विभागाकडे करण्यात येत होती. त्यावरून आता हा निर्णय घेण्यात आले आहे. मात्र शहरातील इतर सर्व उद्याने जोडप्यांसाठी खुली आहेत, असे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना फिरण्या-बसण्यावर बंदी घातलेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
Published on: Aug 26, 2022 12:59 PM
Latest Videos