मोठी बातमी : भाजपच्या बालकिल्ल्याला सुरुंग; काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी

मोठी बातमी : भाजपच्या बालकिल्ल्याला सुरुंग; काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी

| Updated on: Mar 02, 2023 | 12:27 PM

Congress Ravindra Dhangekar wins Kasba by Election 2023 : रविंद्र धंगेकर यांना 73, 194 मतं मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना कसब्यातील जनतेनं 62, 244 मतं दिली आहेत. रविंद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य मिळवत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभूत केलंय. पाहा...

पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे मागची 28 वर्षे भाजपचा बालकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघाला आता सुरुंग लागला आहे. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली तेव्हा पहिल्या फेरीपासूनच रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. अखेर आता त्यांचा विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य मिळवत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे.

 

 

Published on: Mar 02, 2023 12:05 PM