Pune Corona | पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

| Updated on: Jul 08, 2021 | 9:34 AM

पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाबधितांचा आकडा दुप्पट झाला आहे. पुण्यात काल दिवसभरात 432 रुग्णांची वाढ झाली आहे.

पुणे : राज्यात अनलॉक झाल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाबधितांचा आकडा दुप्पट झाला आहे. पुण्यात काल दिवसभरात 432 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बाधितांचा आकडा अचानक दुप्पट झाल्याने पुण्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. (Pune Corona Patient Increase After Unlock)