संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ, अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी पुणे न्यायालयाकडून समन्स
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय शिरसाट यांना पुणे न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहेत.
पुणे : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय शिरसाट यांना पुणे न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहेत. सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात पुणे न्यायालयात तीन रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणात शिरसाट यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. शिरसाठ यांना शिवाजीनगर न्यायालयातील दिवाणी न्यायधीश वाय. एल. मेश्राम यांनी समन्स बजावले आहे.पुढील महिन्यात 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहून दाव्याला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Published on: Jun 08, 2023 01:15 PM
Latest Videos