दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र

दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र

| Updated on: Mar 13, 2023 | 8:20 AM

Rahul Kool Money laundering Case : दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. पाहा...

मुंबई : दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. “राहुल कुल यांनी मनी लॉड्रिंग केलंय. त्यांची चौकशी करा”, असं पत्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. दौंडमधील भीमा- पाटस सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप राहुल कुल यांच्यावर ठेवण्यात आला आहे.”प्रिय देवेंद्रजी, भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते. 500 कोटीचा mony laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे.  आपल्या माहितीसाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पाठवीत आहे. PMLA कायद्याने कारवाई व्हावी, असे घोटाळे संचालक मंडळाने केले आहेत. राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत. शेतकऱ्यांच्या फसवणकीस सरकारी पाठींबा आहे का? कारवाई करा!”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Published on: Mar 13, 2023 07:44 AM