संजय राऊत-राहुल कुल, 500 कोटींचे भ्रष्टाचार अन् हक्कभंगाची कारवाई; नेमकं कनेक्शन काय?

संजय राऊत-राहुल कुल, 500 कोटींचे भ्रष्टाचार अन् हक्कभंगाची कारवाई; नेमकं कनेक्शन काय?

| Updated on: Mar 13, 2023 | 9:45 AM

MLA Rahul Kool Money laundering Case : संजय राऊत यांच्यावरील हक्काभंगाचा प्रस्ताव अन् राहुल कुल यांच्यावरील आरोपांचं कनेक्शन काय?, पाहा सविस्तर...

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर, राहुल कुल यांच्यावरील आरोप आणि संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावाचं ‘ते’ एक कनेक्शन सध्या चर्चेत आलं आहे. जी समिती संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग प्रस्तावावर काम करत आहे. राऊतांवर कोणती कारवाई केली जावी, याचा अभ्यास केला जात आहे.  त्या विधानसभेच्या हक्कभंग समितीचे राहुल कुल हे अध्यक्ष आहेत. त्यामुळे हक्कभंग प्रस्तावानंतर राऊत यांनी हे आरोप केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

Published on: Mar 13, 2023 09:44 AM