Jalyukt Shivar Yojana : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा
Devendra Fadnavis on Jalyukt Shivar Yojana : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमीर खान उपस्थित होते. पाहा व्हीडिओ...
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमीर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. बालेवाडीत पार पडणार पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रमात त्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. “50 टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्र अवर्षणग्रस्त आहे. पाऊस कमी पडतो. त्यामुळे जलसंधारणाची गरज आहे. मागे आमच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवाराची योजना राबवली होती. 20 हजार गावात जलसंधरणाची कामं त्यावेळी झाली. 37 लाख हेक्टर जमीन संचिनाखाली आली. जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा आपण सुरू करतोय. या दुसऱ्या टप्प्यात आपण 5 हजार गावं घेतली आहेत. यावर्षी अलनिनो असणार हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याचा थेंब थेंब वाचवला लागणार आहे, जलसिंचनाची काम करावी लागणार आहेत. यासाठी पाणी फाऊंडेशन खूप चांगलं काम करत आहे. 40 हजार शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे,ते शेतकऱ्यांना ट्रेनिग देतायत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.