अमित शाह फक्त शिवरायांना आदर्श मानतात, ते सध्या पुस्तकही लिहित आहेत

“अमित शाह फक्त शिवरायांना आदर्श मानतात, ते सध्या पुस्तकही लिहित आहेत”

| Updated on: Feb 19, 2023 | 2:26 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर भाष्य केलंय. ते पुण्यात बोलत होते. पाहा व्हीडिओ..

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर भाष्य केलंय. अमित शाह फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. शिवाय शिवरायांवर संशोधन करून ते महाराजांवर पुस्तक लिहीत आहेत. अतिशय योग्य व्यक्तीच्या हातून शिवसृष्टीचं लोकर्पण झालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते सर्वात आधी रायगडावर येऊन नतमस्तक झाले होते, त्यानंतर ते देशभरात गेले, असंही फडणवीस म्हणालेत.

Published on: Feb 19, 2023 02:24 PM