ललित पाटील याच्या आईचा ‘तो’ दावा, एकनाथ खडसे म्हणाले, ‘मलाही तसेच…’
ललित पाटील इतके दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ड्रगचे कारखाने चालवत होता. स्थानिक राजकारण्यांना हे माहिती नाही असे असूच शकत नाही. काही नेत्यांची नावे यात पुढे येईल म्हणून त्याचा एन्काऊंटर केला जावू शकतो असे ललितच्या आईचे म्हणणे आहे. मलाही तसेच वाटते, असे ते म्हणाले.
मुंबई | 18 ऑक्टोंबर 2023 : ललित पाटील याचे धुळे आणि चाळीसगावसोबत नेमके काय कनेक्शन आहे. कुठल्या नेत्यांच्या संपर्कात ललित पाटील होता. नेमकं या दहा दिवसात तो चाळीसगाव आणि धुळ्यालाच का गेला? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. ललित पाटील यांचे अनेक नेत्यांशी संबध असल्याची चर्चा आहे. जळगाव जिल्ह्याचे नाव याआधी देखील या प्रकरणात समोर आले होते. कुणा बड्या नेत्याच्या सहकार्याशिवाय दहा दिवस ललित पाटील लपून राहिला नसता. सरकारचे काही प्रशासकीय मंत्री, अधिकारी यांची नावे या प्रकरणात पुढे येऊ शकतात. त्यामुळे सरकार सहजासहजी त्याची नार्को टेस्ट करणार नाही. मात्र, आमची मागणी हीच राहिल की त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे असेही खडसे म्हणाले.
Published on: Oct 18, 2023 08:11 PM
Latest Videos