कसबा पोटनिवडणुकीबाबत हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांचा महत्वाचा निर्णय
भाजप नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. हिंदू महासंघही निवडणुकीच्या रिंगणात आहे. आनंद दवे यांचा महत्वाचा निर्णय. पाहा...
पुणे : भाजप नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. यात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होतोय. तसंच हिंदू महासंघही निवडणुकीच्या रिंगणात आहे. आनंद दवे हिंदू महासंघाकडून निवडणूक लढवत आहेत. आनंद दवे उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. उद्या कसब्यात हिंदू महासंघाची विजय संकल्प यात्रा होणार आहे. या यात्रेतून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. कसबा गणपती मंदिर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर अशी हिंदू महासंघाची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीतून आनंद दवे उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत.
Published on: Feb 11, 2023 02:42 PM
Latest Videos