निकालाआधीच पुणेकरांनी आपला आमदार ठरवून टाकला, कोण आहे कसब्याचा भावी आमदार?
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा 2 मार्चला लागणार आहे. मात्र त्याआधीच विजयाचे पोस्टर झळकले आहेत. पाहा...
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर 2 मार्चला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र या निकालाआधीच पुणेकरांनी विजयाचे पोस्टर लावले आहेत.निवडणुकीच्या निकाल आधीच दोन्ही गटाकडून विजयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. आधी काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर झळकले. तर आत हेमंत रासने यांच्या समर्थकांकडून देखील पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुण्यातील समाधान चौकात हेमंत रासने यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. निकाल आधीच आमदार हेमंत रासने म्हणत समर्थकांकडून रासने यांना शुभेच्छा देण्यात आले आहेत. तर काल पुण्यातील अनेक चौकात रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे देखील बॅनर लावण्यात आले होते. पण आता हे विजयाचे बॅनर हटवण्यात आले आहेत. मात्र निकालाआधीच दोन्ही गटाकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आल्याने पुण्यात चर्चांना उधाण आलंय.