छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीनंतर किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना ‘तो’ एक प्रश्न विचारला
Kirit Somaiya : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागातील राम मंदिर परिसरात काल मध्यरात्रीनंतर दोन गटात राडा झाला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागातील राम मंदिर परिसरात काल मध्यरात्रीनंतर दोन गटात राडा झाला. यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही या दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत म्हणत होते की, आता दंगे सुरू होणार आहेत. ते हेच दंगे आहेत का? शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या नावाने संजय राऊत सांगत होते ती हीच दंगल आहे का?”, असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. किरीट सोमय्या बापट कुटुंबाला भेटण्यासाठी पुण्यात आहेत. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.
Published on: Mar 30, 2023 12:53 PM
Latest Videos