पुण्यातील गुगलचं ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी; कारण वाचून थक्क व्हाल...

पुण्यातील गुगलचं ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी; कारण वाचून थक्क व्हाल…

| Updated on: Feb 13, 2023 | 12:44 PM

पुण्यातील कोरेगाव पार्कमधल्या गुगल ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल एका व्यक्तीने केला होता. पाहा व्हीडिओ...

पुणे : पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधल्या गुगल ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल एका व्यक्तीने केला होता. मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये अशी धमकी देणारा निनावी फोन आला होता. बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठेही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता, त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. 45 वर्षीय व्यक्तीला हैद्राबादमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. हा व्यक्ती दारूच्या नशेत होता आणि अशात त्याने हा कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात वास्तव्यास आहे. त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच गोष्टीचा राग मनात धरून या व्यक्तीने भावाला त्रास व्हावा, म्हणून दारूच्या नशेत थेट गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली.

Published on: Feb 13, 2023 12:44 PM