कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बोगस मतदान? उमेदवार आणि मतदारांचा आरोप

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बोगस मतदान? उमेदवार आणि मतदारांचा आरोप

| Updated on: Apr 28, 2023 | 9:32 AM

Pune Krishi Utpanna Bazar Samiti Election 2023 : पुण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी मोठा गोंधळ; बोगस मतदान होत असल्याचा उमेदवार-मतदारांचा आरोप

पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला आहे. या मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप मतदार आणि उमेदवारांनी केला असून. यावेळी पोलीस आणि मतदारांमध्ये मोठी बाचाबाची देखील झालेली पाहायला मिळाली. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या इमारतीत मतदान पार पडत असून जवळपास 13000 मतदान आपल्या मतदानाचा हक्क या मतदान केंद्रावर बजावणार आहेत. दरम्यान मतदान सुरू होताच अवघ्या काही वेळात या मतदान केंद्राच्या बाहेर पोलीस आणि मतदारांमध्ये मोठी बाचाबाची देखील झालेली पाहायला मिळाली. त्यासोबतच अनेक लोकांनी या मतदानावर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केलेली आहे.

Published on: Apr 28, 2023 09:32 AM