आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार
पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे. पाहा व्हीडिओ...
पुणे : पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा (Maharashtra Kesari) थरार रंगणार आहे. पुण्यातील कोथरूडच्या मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आज संध्याकाळी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीचं कोथरूडमध्ये उद्घाटन होणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. 10 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र केसरीची थरारक लढत पाहायला मिळेल. 14 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde) या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
Published on: Jan 10, 2023 09:22 AM
Latest Videos