पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन, ‘या’ मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पाहा काय आहेत मागण्या...
पुणे : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. कालपासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. परीक्षा पद्धतीची नवी प्रणाली 2025 पासून लागू करण्याचा निर्णय जाहीर करा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. सरकारने फक्त निर्णय दिला असून जीआर आला नाही, असा आरोप हे विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
Published on: Feb 21, 2023 08:32 AM
Latest Videos