Amit Thackeray यांच्यासमोर मनसे पदाधिकाऱ्यांची मोठी मागणी, पुण्यातील राजकारणात नेमकं काय घडणार?
VIDEO | पुण्यातील राजकारणात नेमकं काय घडणार? आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असताना अमित ठाकरे यांच्यासमोर मनसे पदाधिकाऱ्यांनी केली मोठी मागणी
पुणे, १३ सप्टेंबर २०२३ | आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापली कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. अशातच मनेसेचे नते अमित ठाकरे हे काल पुणे दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. दरम्यान, अमित ठाकरे यांच्यासह त्यावेळी मनसेचे काही महत्त्वाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठी मागणी केल्याचे समोर आले आहे. ‘या बैठकीत मनसेचा पुणे लोकसभेचा चेहरा आधी जाहीर करा, लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी तुमच्याकडून नाव येऊ द्या’, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. तर अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आता हा अहवाल अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देणार आहेत.
Published on: Sep 13, 2023 01:00 PM