मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे आभार; मिळकतकराची सवलत कायम ठेवल्यानंतर चंद्रकांत पाटलांकडून आभार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे आभार; मिळकतकराची सवलत कायम ठेवल्यानंतर चंद्रकांत पाटलांकडून आभार

| Updated on: Apr 20, 2023 | 8:24 AM

Pune News : 40 टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पुढील कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव आणून मान्यता देण्यात येणार आहे.

पुणे : पुणेकरांना 40 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे आभार मानलेत. “पुणेकरांच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. 1970 पासून पुणे महापालिकेत मालमत्ता करामध्ये 40 टक्के सवलत देण्याची प्रथा होती. 1970 ते 2010 मध्ये कुठेच आडकाठी आली नाही. नंतर काही अडचणींमुळे 2019 पासून ही सवलत रद्द करावी, असा निर्णय झाला. नंतर वाढीव बिलं यायला लागली. नागरिकांची मागणी होती की, ही सवलत कायम ठेवावी पण हे इतकं सोपं नव्हतं. पण यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी मीटिंग घेतल्या. आज शेवटी कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय झाला. 2019 ते 2023 पर्यंत ज्यांनी ही वाढीव बिल भरली आहेत. त्यांना पुढील बिलातून अॅडजेस्ट करून देण्यात येणार आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Published on: Apr 20, 2023 08:23 AM