काल संजय राऊतांनी पुतळ्याला हार घातला, आज कारखान्याच्या कामगारांनी शुद्धीकरण केलं
Bhima Patas Cooperative Sugar Factory : संजय राऊतांनी हार घातला म्हणून आज पुतळ्याचं शुद्धीकरण; दौंडच्या पाटसमध्ये चर्चांना उधाण. पाहा व्हीडिओ...
पाटस, दौंड : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची काल पुण्यातील दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये सभा झाली. या सभेच्या आधी संजय राऊत यांनी केलेल्या कृतीवर आज प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी काल भीमा पाटस कारखान्यात जाऊन मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण केला. त्यानंतर ते सभास्थळी रवाना झाले. या मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याचं भीमा पाटस कारखान्याच्या कामगारांनी शुद्धीकरण केलं आहे. संजय राऊत यांनी काल या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला होता. त्यामुळे हे शुद्धीकरण करण्यात आलं. गोमूत्र शिंपडून पुतळ्याचं शुद्धीकरण करण्यात आलं. त्यानंतर पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात घालण्यात आला. यावेळी कारखान्याच्या कामगारांनी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
Published on: Apr 27, 2023 12:16 PM
Latest Videos