संजय राऊत यांची उद्या दौंडमध्ये सभा; सुषमा अंधारे यांचीही तोफ धडाडणार, पाहा व्हीडिओ…
भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आणि राहुल कुल यांच्यावर संजय राऊत काय बोलणार? राजकीय वर्तुळाचं लक्ष. पाहा व्हीडिओ...
दौंड, पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची उद्या दौंडमध्ये सभा होतेय. भीमा बचाव शेतकरी सभासद कृती समितीच्या वतीने या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. भीमा सहकारी कारखान्यात भष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता राहुल कुल यांच्याच मतदारसंघात संजय राऊत जाहीर सभा घेत आहेत. दौंड तालुक्यातील वरवंड इथे उद्या संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेदेखील संबोधित करणार आहेत. दौंडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांनी याचं आयोजन केलं आहे. रविंद्र धंगेकर यांची कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
Published on: Apr 25, 2023 10:10 AM
Latest Videos