सामना एका पक्षाचे मुखपत्र, मात्र त्यातून फक्त टीकाच केली जाते; शिवसेनेच्या नेत्याचं टीकास्त्र

सामना एका पक्षाचे मुखपत्र, मात्र त्यातून फक्त टीकाच केली जाते; शिवसेनेच्या नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Apr 10, 2023 | 11:00 AM

Deepak Kesarkar On Saamana : मंत्री दीपक केसरकर यांनी सामना वृत्तपत्र, ठाकरेगट आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

पुणे : मंत्री दीपक केसरकर यांनी सामना वृत्तपत्र, ठाकरेगट आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सामना हे एका पक्षाचं मुखपत्र आहे. मात्र त्यात फक्त टीकाच केली जाते. बाळासाहेबांनी यासाठी ते पक्षाचे मुखपत्र केलं नव्हतं. त्यांना हेतू व्यापक होता. आता मात्र फक्त टीकाच केली जाते, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. अयोध्या दौऱ्यात काही मंत्री,आमदार,खासदार नव्हते. त्यांचे आधीच नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यावर निगेटिव्ह बोलण्याची गरज नाही, असं म्हणत केसरकर यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

Published on: Apr 10, 2023 11:00 AM