अजित पवार नाराज? दिलीप वळसे पाटील यांचं दोन वाक्यात उत्तर

अजित पवार नाराज? दिलीप वळसे पाटील यांचं दोन वाक्यात उत्तर

| Updated on: Apr 13, 2023 | 3:28 PM

आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावरही माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा ते काय म्हणालेत...

पुणे : मागच्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार नाराज नाहीत. अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका, असं वळसे पाटील म्हणालेत. महविकास आघाडी एकजूट आहे. मवीआच्या समन्वय समितीमध्ये सर्व निर्णय होतात. आघाडीबाबत मतं व्यक्त करण्याआधी या समितीशी बोलावं, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही सोबत आहोत. कुणीही मनात शंका आणण्याचं कारण नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावरही वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीये. एकनाथ शिंदे यांच्यासोबत काहीही चर्चा झालेली नाही. आम्हाला कळवलंही नव्हतं. वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली असू शकते, असं वळसे पाटील म्हणालेत.

Published on: Apr 13, 2023 03:28 PM