पुण्यात लशींचा तुटवडा, लसीकरण केंद्र बंद; पुन्हा कधी सुरू होणार? पाहा...

पुण्यात लशींचा तुटवडा, लसीकरण केंद्र बंद; पुन्हा कधी सुरू होणार? पाहा…

| Updated on: Apr 06, 2023 | 3:47 PM

पुण्यात आज लसीकरण केंद्र बंद आहेत. ही केंद्र कधी सुरु होणार? याविषयी जाणून घेऊयात...

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कोरोना लशीचा साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलं आहे. हे लसीकरण केंद्र पुन्हा कधी सुरू होणार? अशी अनेकांच्या मनात शंका आहे. या विषयी पुणे महापालिका आरोग्यप्रमुख डॉ.भगवान पवार यांनी दिली आहे. “राज्य सरकारकडे आम्ही 25 हजार कोव्हीशिल्ड लसीची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात लसीकरण सुरू होईल”, अशी माहिती डॉ.भगवान पवार यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रात अनेकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. कोरोना सर्व्हेसाठी 184 पथकं तयार असून शहरात सर्व्हे सुरू आहे. सध्या कोरोनाचा एकही रुग्ण रुग्णालयात अॅडमिट नाही, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

Published on: Apr 06, 2023 03:47 PM