पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागल्यास राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार? जयंत पाटील यांनी उघडपणे सांगितलं...

पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागल्यास राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार? जयंत पाटील यांनी उघडपणे सांगितलं…

| Updated on: Apr 11, 2023 | 1:09 PM

Jayant Patil : 'या' नेत्याला उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही? जयंत पाटील नेमकं काय म्हणालेत? पाहा सविस्तर प्रतिक्रिया...

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर पुण्यातील खासदारकीची जागा रिक्त झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाचा भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. प्रशांत जगताप यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल करण्यात आलं आहे. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसभेची निवडणूक उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. अर्थात जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी अशी अमच्या पक्षाची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत आम्ही चर्चा करू”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

Published on: Apr 11, 2023 01:09 PM