कोल्हापूर- पुणे-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा चालू करण्याची मागणी

कोल्हापूर- पुणे-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा चालू करण्याची मागणी

| Updated on: Apr 20, 2023 | 8:06 AM

Kolhapur Pune Mumbai Sahyadri Express : कोल्हापूर- पुणे-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : गेल्या अनेक दिवसापासून बंद असणारी कोल्हापूर- पुणे-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. सह्याद्री एक्सप्रेस साठी रेल्वे प्रशासनाचा बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कोरोना काळात रेल्वे प्रशासनाकडून अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी सह्याद्री एक्सप्रेस सुद्धा बंद करण्यात आली होती. पण आता कोल्हापूर- पुणे-मुंबई दरम्यान धावणारी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा चालू करण्याची मागणी होत आहे. ही एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल. त्यामुळे ही रेल्वे लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही रेल्वे पुन्हा सुरू झाल्यास कोल्हापूरहून मुंबई, पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी असेल.

Published on: Apr 20, 2023 07:55 AM