अन् भरपत्रकार परिषदेत प्रिया बेर्डे रडल्या; पाहा व्हीडिओ…
Marathi Actress Priya Berde Press Conference : मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर काल घेतलेल्या भरपत्रकार परिषदेत त्या रडल्या. पाहा व्हीडिओ...
पुणे : मराठीतील वरिष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी काही दिवसांआधी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात बोलताना प्रिया बेर्डे रडल्या.कलाकारांची अवस्था पाहून प्रिया बेर्डे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि भर पत्रकार परिषदेत प्रिया बेर्डे रडल्या. यात बोलताना त्यांनी मराठी सिनेसृष्टी कलाकारांच्या अवस्थेवर भाष्य केलं. गेली 40 वर्षे मी सिनेसृष्टीत काम करत आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी मी काम सुरू केलं. मनोरंजन क्षेत्रासाठी काम करणारी कुठलीही संस्था नाही. इंडस्ट्रीमध्ये कलाकार आणि इतर लोकांमध्ये भेदभाव केला जातो. राज्यात नाट्यगृहांची दुरावस्था आहे. कलाकारांची दुरावस्था बघवत नाही, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
Published on: Apr 12, 2023 09:26 AM
Latest Videos