राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये प्रवेश का?; प्रिया बेर्डे यांनी मर्यादेचा मुद्दा मांडला
Priya Berde Press Conference : इंडस्ट्रीमध्ये कलाकार आणि इतर लोकांमध्ये भेदभाव केला जातो. कलाकारांची दुरावस्था बघवत नाही, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या. पाहा सविस्तर...
पुणे : अभिनेत्री प्रिया बेर्डे या आधी राष्ट्रवादीत होत्या. काही दिवसांआधी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.राष्ट्रवादी सोडण्यामागचं कारण प्रिया बेर्डे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला चांगलं काम करायचं होतं. पण तिथं काही मर्यादा होत्या. माझ्याकडे काम मर्यादित होतं. काम करण्याचा स्पेस म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे नेते लगेच भेटतात. मदत करतात”, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या आहेत. “मला प्रसिद्ध व्हायची इच्छा नाही. मला ट्रोल करा, मला बोला, बेर्डेसाहेबांना का ट्रोल करता? आतापर्यंत सांस्कृतिक विभाग दुर्लक्षित होता. तो फक्त प्रचारापूरता मर्यादित राहिला. आता प्रत्येक कलाकराला न्याय मिळेल. आम्हाला प्रचाराला बोलावलं जात पण पुन्हा गृहीत धरलं जात नाही. आता तसं होणार नाही”, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.