पुण्यातील लोकसभेची जागा काँग्रेसने आम्हाला द्यावी; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची मागणी

पुण्यातील लोकसभेची जागा काँग्रेसने आम्हाला द्यावी; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची मागणी

| Updated on: Apr 13, 2023 | 8:29 AM

Pune Loksabha By election : पुण्यात पोटनिवडणूक लागल्यास कसभेची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला द्यावी; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने ही मागणी केलीय. पाहा...

पुणे : पुणे लोकसभेची जागा काँग्रेसने मोठ्या मनाने राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या वेळी आम्ही कसबा मतदारसंघ काँग्रेसला दिला. आता त्यांनी दिलदारपणा दाखवून लोकसभेची सीट आम्हाला द्यावी. कसबा विधानसभेवेळी आम्ही तुम्हाला मदत केली आता तुम्ही लोकसभेची जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी रूपाली पाटील-ठोंबरे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहेत. विधानसभेच्या वेळी कसब्याची जागा आम्ही काँग्रेसला दिली. आम्ही तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेवेळी कसब्यात खूप काम केलं आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद देखील जास्त आहे. त्यामुळे ही जागा आता राष्ट्रवादीला मिळावी, अशी आमची इच्छा आहे, असंही त्या म्हणाल्या आहे.

Published on: Apr 13, 2023 08:29 AM