पुण्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची विजयाकडे वाटचाल; पाहा व्हीडिओ...

पुण्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची विजयाकडे वाटचाल; पाहा व्हीडिओ…

| Updated on: Apr 29, 2023 | 12:09 PM

Market Committee Election Result 2023 : पुणे जिल्ह्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : पुणे जिल्ह्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. हमाल मापारी मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार विक्रम पांडुरंग दगडे 82 मते घेऊन विजयीच्या दिशेने जाताना दिसत आहेत.त्यांच्या विरोधकला 35 मते मिळाली आहेत. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतमोजणी आज सासवडमध्ये सुरु आहे. भाजप शिवसेना यांच्या युतीच्या वतीने ज्या जागेवर विजयाचा दावा केला जात होता त्याच जागेवर आघाडीचे विक्रम दगडे बहुमताने निवडून आलेत. त्यांना 85 मत मिळाले आहेत तर त्यांची विरोधक युतीचे उमेदवार युतीच्या उमेदवाराला 35 मते मिळाली आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेने आघाडीला आव्हान दिलंय. मात्र आपला गड राखण्यात आघाडीला यश येईल असे चित्र स्पष्ट होतंय.

Published on: Apr 29, 2023 11:55 AM