'त्या' गाण्यावर आक्षेप, गायकाकडून माफीनामा; पाहा प्रकरण काय आहे...

‘त्या’ गाण्यावर आक्षेप, गायकाकडून माफीनामा; पाहा प्रकरण काय आहे…

| Updated on: Apr 20, 2023 | 7:43 AM

Pune News Rap Song Case : माफी मागतो तक्रार मागे घ्या; पुण्यातील रॅप सॉंग प्रकरणी गायकानी विनंती

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात केलेल्या वाद आता अधिकच वाढताना दिसत आहे. एकीकडे कोणतीही परवानगी न घेता अश्लील भाषेत रॅप सॉंग चित्रीत करणाऱ्या तरुणाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता त्या तरुणाची शुक्रवारी पुणे पोलिसांकडून चौकशी देखील होणार आहे. अश्लील भाषेचा वापर तसेच बंदूक आणि तलवारदेखील दाखवण्यात आली होती. याच कारणावरून पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात शुभम आनंद जाधव या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी शुभमची चौकशी देखील होणार होती. पण आता ज्याने हे सॉंग गायलं पुढे येत या सगळ्या गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं आहे.याबाबत मी रीतसर परवानगी मागितली होती. तरीही माझ्यावर कारवाई करण्यात येत असून मी माफी मागतो, तक्रार मागे घ्या अशी विनंती शुभमने केली आहे.

Published on: Apr 20, 2023 07:43 AM